Thu, Jul 18, 2019 16:41होमपेज › Jalna › जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८७.टक्के, मुली अग्रेसर

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८७.टक्के, मुली अग्रेसर

Published On: May 31 2018 1:36AM | Last Updated: May 30 2018 11:17PMजालना : प्रतिनिधी

बारावीचा निकाल 87.45 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली. भोकरदन तालुक्याचा जिल्ह्यात सर्वाधिक तर बदनापूर तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला.

जिल्ह्यात 27 हजार 182 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यात 23 हजार 772 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 14 हजार 792 मुले तर 8980 मुलींची संख्या आहे. पास होण्यात मुलींची टक्केवारी 91.17 तर मुलांची टक्केवारी 85.35 आहे. विज्ञान शाखेत 11 हजार 149 विद्यार्थी उतीर्ण झाले. या शाखेची टक्केवारी 95.90 टक्के आहे. कला शाखेचा निकाल 80.31 टक्के लागला. या शाखेतील 10 हजार 435 मुले उर्तीण झाले. 

वाणिज्यचा निकाल 80 टक्के

वाणिज्य शाखेचा निकाल 80.31 टक्के लागला असून या शाखेतील 1883 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एमसीव्हीसीमधून 305 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल पाहण्यासाठी विविध इंटरनेट कॅफेवर विद्यार्थ्यांनी दुपारी गर्दी केल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील चार कनिष्ठ महाविद्यालयांचे निकाल 25 टक्क्यांपेक्षा कमी लागले. भोकरदन तालुक्याचा निकाल सर्वाधिक 93. 70 तर बदनापूर तालुक्याचा सर्वात कमी 78.06 एवढा लागला. 

भोकरदन : उज्वल निकालाची परंपरा 

बारावी परीक्षेत भोकरदन तालुक्यातील सर्वच महाविद्यालयांनी शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. ग्रामीण भागातील छत्रपती संभाजी उच्च माध्यमिक विद्यालय, तांदूळवाडीचा निकाल 100 टक्के, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय 97.52 टक्के, संत ज्ञानेश्‍वर विद्यालय, हसनाबाद 98.26 टक्के, मोरेश्‍वर महाविद्यालय 92.50 टक्के निकाल  लागला आहे. न्यु हायस्कूल 92.02 टक्के, अलहुदा उर्दू हायस्कूल 95.96 टक्के, शारदा विद्या मंदिर 96.77 टक्के, प्रियदर्शनी हायस्कूल 86.66 टक्के, सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव 98.89 टक्के असे निकाल लागले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खा. रावसाहेब  दानवे, नगराध्यक्ष मंजुषा देशमुख, जि.प.सदस्या आशा पांडे, गटशिक्षणाधिकारी शहागडकर आदींनी शुभेच्छा दिल्या.