Thu, Jan 24, 2019 16:35होमपेज › Jalna › महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे

महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे

Published On: Feb 14 2018 2:51AM | Last Updated: Feb 14 2018 2:41AMजालना ः प्रतिनिधी

खरिपातील पीक मातीमोल झाल्यानंतर आशा टिकून असलेल्या रब्बीची पिकेही गारपिटीने जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पुरता गार झाला आहे. जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपिटीने 32 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे. फळबाग आणि पिकांचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून सुरू झाले आहे. जिल्ह्यात कपाशीवर आलेल्या बोंडअळीने झोळ्या रिकाम्या ठेवल्या.

दरम्यान रविवारी झालेल्या गारपिटीने जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान जालना व मंठा तालुक्यात झाले असून, 208 गावांतील पिके गारद झाली. सर्वाधिक फटका द्राक्षे, डाळिंब, आंबा, मोसंबीसह रब्बी हंगामातील गहू, ज्वारी तसेच भाजीपाला आदी पिकांना बसला. जालना तालुक्यात 13 हजार 257 हेक्टर, घनसावंगी 94 हेक्टर, अंबड 1 हजार 740 हेक्टर, जाफराबाद 9171 हेक्टर आणि मंठा 12 हजार 934 हेक्टरला तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील  पंचनामे आठ दिवसांत पूर्ण होईल. यानंतर नुकसीनीची परिपूर्ण माहिती येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले