Mon, May 27, 2019 00:53होमपेज › Jalna › मालमत्ता ५१ हजार, नळ जोडण्या २२ हजार

मालमत्ता ५१ हजार, नळ जोडण्या २२ हजार

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 11:07PMजालना : अप्पासाहेब खर्डेकर

नगरपालिकेच्या हद्दीत 51 हजार मालमत्तांची नोंद झाली आहे, तर पाणीपुरवठा विभागाच्या दप्तरी नळधारकांची संख्या केवळ 22 हजार  346 आहे. विशेष म्हणजे  कर विभागाच्या दफ्तरी नळधारकांची संख्या जवळपास 16 हजार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नळजोडणीधारकांची संख्या किती, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे; परंतु अद्यापही हजारोंच्या संख्येने अवैध नळजोडण्या असून पालिकेचा मोठा महसूल यामुळे बुडत आहे. 

नगर पालिकेने मध्यंतरी अनधिकृत नळधारकांविरुद्ध मोहीम उघडली होती. मात्र त्यात काही साध्य झाले नाही. तसेच नियमित पाणीपट्टीचा भरणा करणार्‍या नागरिकांना अवैध नळ जोडण्यांमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मालमत्तांच्या सर्वेक्षणानंतर नळजोडण्याचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद घेणे अपरिहार्य झाले आहे. एकीकडे तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनात झालेली वाढ, मुख्य जलवाहिनीवर असलेली गळती, यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना अवैध नळजोडण्यामुळे नियमित पाणीपट्टीचा भरणा करणार्‍या नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.