होमपेज › Jalna › दारूबंदीसाठी पोेलिस चौकीत ठिय्या 

दारूबंदीसाठी पोेलिस चौकीत ठिय्या 

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:05AMराजूर : प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यातील खामखेडा गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी शनिवारी संतप्त महिलांनी राजूर पोलिस चौकीत ठिय्या मांडला. खामखेडा गावात बिनदिक्‍कत देशी दारूची विक्री केली जात आहे. सहज दारू मिळत असल्यामुळे व्यवसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. महिलांनाही तळीरामांचा त्रास वाढला आहे. दारूबंदीसाठी वेळोवेळी मागणी करूनही पोलिस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. शनिवारी खामखेडा येथील महिलांनी थेट राजूर पोलिस चौकी गाठून तत्काळ कारवाईची मागणी करीत ठिय्या मांडला. 

महिलांचे उग्ररूप पाहून पोलिसांनी निवेदन स्वीकारून दारूबंद करण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी शिवसनेचे माजी तालुका प्रमुख कैलास पुंगळे, नारायण नागवे, गुंफाबाई नागवे, अंतिकाबाई नागवे, इंद्राबाई नागवे, कुशीवर्ताबाई नागवे, शांताबाई नागवे, सरसाबाई नागवे, कांताबाई नागवे, सयाबाई नागवे आदी उपस्थित होते.