Sat, Jun 06, 2020 23:12होमपेज › Jalna › जालना : परतूरमध्ये गुटख्याच्या २५ गोण्या जप्त (video) 

जालना : परतूरमध्ये गुटख्याच्या २५ गोण्या जप्त (video) 

Published On: Sep 24 2019 1:40PM | Last Updated: Sep 24 2019 1:40PM

पोलिसांनी जप्त केलेला ट्रकपरतूर (जालना) : प्रतिनिधी

परतूर शहरात रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास आष्टी रेल्वेगेटजवळ आयशर ट्रकमधून २५ गोण्या अवैध गुटखा घेऊन जात असताना पोलिसांनी जप्त केला.

गुटखा घेऊन जाणाऱ्या ट्रकची गुप्त माहिती परतूर पोलिसांनी मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी आष्टी रेल्वेगेवटर सापळा लावून हा ट्रक पकडला. यानंतर हा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणला आहे. या ट्रकवर जालना येथील अन्न औषध प्रशासन अधिकारी येवून कारवाई करतील, अशी माहिती परतूर पोलिसांकडून मिळली आहे.