Fri, Jul 19, 2019 18:23होमपेज › Jalna › शरीर हे रसायनशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण : शर्मा

आयसीटी : अभ्यासक्रमाला प्रारंभ, मुंबईनंतर जालन्यात केंद्र

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 12:18AMजालना : प्रतिनिधी

मानवी जिवनाशी रसायनशास्त्र तंत्रज्ञानाचा जवळचा संबध असून शरीर हे रसायनशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे प्रतिपादन आयसीटीचे माजी कुलगुरू एम. एम. शर्मा यांनी केले.

आयसीटी महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमाची सुरुवात अतिरिक्‍त एम. आय.डी. सी. मध्ये आयोजित कार्यक्रमात मंगळवार, 28 ऑगस्ट रोजी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शर्मा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई आयसीटीचे कुलगुरू जे. डी. यादव, उपकुलगुरू स्मिता लेले, प्रा. वाघिया आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शर्मा म्हणाले की, मुंबईनंतर मराठवाड्यातील जालना शहरासारख्या छोट्या शहरात आयसीटीची शाखा सुरू होत आहे. हा सुवर्णाक्षरांनी लिहावा, असा दिवस आहे. मानवी शरीर हे रसायन तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून देता येईल. शरीरात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त झाल्यास काय होईल? शरीरात मीठ व साखर जास्त झाल्याने होणारे परिणाम हेसुद्धा रसायन तंत्रज्ञानासारखे आहे. शरीराचे सर्व पार्ट फिट असले तरच आपण शरीर फिट असल्याचे म्हणतो. केमिकल इंजिनियरिंगचेही तेच काम आहे. आयसीटीची पदवी मिळाली म्हणजे संपले असे नाही.

विद्यार्थ्यानी विद्यार्थ्यानी स्वतःला नेहमी अपडेट ठेवावे. नसता ते आउट डेटेड होतील असा सल्‍लाही त्यांनी यावेळी दिला. दररोज नवीन येणार्‍या तंत्रज्ञानाचा अभ्यास करा. पॉलीस्टर फायबर आले नसते तर आकर्षक रंगीत साड्या बनणे शक्य झाले नसते. जिवनात रंग भरण्याचे काम रसायन तंत्रज्ञानामुळे शक्य होउ शकले. रसायन तंत्रज्ञानाने मानवी जिवनात क्रांती केली आहे.डायपर, सॅनीटरी नॅपकीनमधे वापरले जाणारे अ‍ॅक्रालिक अ‍ॅसिड हेच वॉटर बेस पेंन्टमधेही वापरले जाते.महाभारतात लाखेचे घर तयार करण्यात आले होते, ते सुध्दा रसायन तंत्रज्ञान होते.प्लास्टीक बंदीबाबत बोलतांना शर्मा म्हणाले कि, प्लास्टीक निर्मीती करणार्‍या कंपन्या दोषी नसुन ते पालिकेचे अपयश आहे.आय.आय.टी. व आयसीटी हे दोन जगात चालणारे बँ्रड असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयसीटीची जादू मराठवाड्याला माहिती नाही : यादव

आयसीटीची जादू मराठवाड्याला माहिती नाही. तुमच्या माध्यमातून ते जगाला दाखवून द्या. येथून बाहेर पडल्यावर रोजगार करणारे नव्हे तर रोजगार देणारे बना, असे आवाहन आयसीटीचे कुलगुरू जे. डी. यादव यांनी केले. जालन्यात आयसीटीची पहिली शाखा सुुरू होत आहे, याचा आनंद होत आहे. या शाखेचे विद्यार्थी बनण्याचा इतिहास तुम्ही नोंदविला आहे. तुम्ही सर्वजण आयसीटीचे बॅ्रण्ड अ‍ॅम्बॅसिटर व्हा. रसायनशास्त्रच नव्हे तर इतर विषयांतही संशोधन करता येणार आहे. ज्ञान हे भांंडार आहे. जगातील दहा महाविद्यालयांत आयसीटीचा समावेश असावा, हे आमचे स्वप्न आहे. जालन्यात बारावीनंतर या महाविद्यालयात इंटिग्रेटेड एम. टेक केमिकल सुरू करण्यात येत आहे. या कोर्समध्ये 60 विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांच्या गु्रप अ‍ॅक्टिव्हिटीज राहणार आहेत. 300 विद्यार्थी विद्यालयात प्रशिक्षण घेत असतानाच 300 विद्यार्थी देशासह विदेशातील कंपनीत प्रशिक्षण घेणार आहेत. त्यासाठी त्यांना कंपनीतर्फे मानधन मिळणार आहे. विद्यार्थ्यांना जालना येथील प्राध्यापक प्रत्यक्ष शिकवीत असतानाच मुंबई येथील प्राध्यापक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून शिकवणार आहेत. मुकेश अंबानी यांच्या जिओ कंपनीने मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने होणार आहे. विद्यार्थी गैरहजर असल्यास पालकांसह विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर एसएमएस पाठविला जाणार आहे.