Mon, Nov 19, 2018 19:04होमपेज › Jalna › रुग्णालय बांधकाम : खोतकरांकडून पाहणी

रुग्णालय बांधकाम : खोतकरांकडून पाहणी

Published On: Jan 29 2018 12:59AM | Last Updated: Jan 29 2018 12:55AMजालना ः प्रतिनिधी

गांधी चमन परिसरात नवीन उभारण्यात येणार्‍या जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या नूतन इमारत बांधकामाची पाहणी पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी (दि. 28) केली. रुग्णालयाचे बांधकाम दर्जेदार होत असल्याचे खोतकर यावेळी म्हणाले.

 प्रारंभी राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते बालकास पोलिस डोसही देण्यात आला. यानंतर त्यांनी महिला व बाल रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी केली. इमारत पूर्ण झाल्यावर रुग्णालयात महिला व बालकांना उपचार चांगल्या पद्धतीने देण्यात यावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित डॉक्टरांना केल्या. 

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. के. राठोड, डॉ. आर. एस. पाटील,  डॉ. मनीष जाधव, डॉ. अमोल लोंढे आदींची उपस्थिती होती.