Sun, Mar 29, 2020 08:36होमपेज › Jalna › जालना : घनसावंगी तालुक्यात गारांचा पाऊस

जालना : घनसावंगी तालुक्यात गारांचा पाऊस

Last Updated: Mar 19 2020 12:41PM
राणिउंचेगाव : प्रतिनिधी  

घनसावंगी तालुक्यातील गाढे सावरगांवसह परिसरात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामध्ये बोराच्या आकाराच्या गारा पडल्याने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षे, मोसंबी, डाळिंब, गहू, हरभरा, ज्वारी, मका या शेतात उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची मोठी दैना झाली. दरम्यान वाळविण्यासाठी टाकलेली पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची पडत्या गारांमध्ये लगबग दिसून आली.

गाढे सावरगांव येथील शेतकरी मंजितराव खोतकर यांनी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना व्यक्त केली. तसेच द्राक्षे, मोंसबी, पिकाचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर मुढेगांव येथील शेतकरी इम्रानखा ऊदखा, पटेल, दाऊदखा अकबरखा पटेल, रहेमानखा दाऊदखा पटेल, कडुखा जफरखा पटेल यांचे मोंसबी पिकाचे नुकसान झाले आहे. 

राणिउंचेगाव येथील शेतकरी जगन्नाथ रामा जाधव, हरीदास गोवर्धन जाधव यांचे गहु, ज्वारी, हरभरा पिकाचे नुकसान झाले. येथील शेतकरी यांनी फारूक रऊफ कुरेशी यांच्या मोंसबी, मका पिकाचे नुकसान झाले. नि.पिपळगांव येथिल गणेश नारायण महाडीक, नारायण एकनाथ महडीक, बालासाहेब आसाराम कुमकर तसेच तळेगांव शेतकरी श्रीकीसन बद्रिनारायण शिवतारे यांचे गारपिटामुळे मोंसबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर जगन्नाथ जाधव यांच्या शेतातील गव्हाचे उभ्या पिकाचे गारांमुळे पिकांचे मोठे नुकसान आहे.