Sun, Jul 21, 2019 16:59
    ब्रेकिंग    होमपेज › Jalna › नागवेलीची पाने विकून तीन मुलांना घडविले

नागवेलीची पाने विकून तीन मुलांना घडविले

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 07 2018 1:40AMमाहोरा : गजानन राऊत 

भोकरदन तालुक्यातील वालसा येथील रहिवाशी सुखदेव जानकीराम तेलंग्रे यांनी नागवेलीची पाने विकून  मुलांना घडविले. पहिला मुलगा वकील दुसरा शिक्षक तर तिसर्‍याला इंजिनिअर बनविले. हालखीच्या परिस्थितीतही मुलांचे भविष्य घडविण्याचे उत्तम उदाहरण तेलंग्रे यांनी निर्माण केले आहे.

वालसा वडाला येथील सुखदेव तेलंग्रे यांची  हालाखिची परिस्थिती आहे. भूमिहीन असलेल्या सुखदेव यांनी जिद्दीने नागवेलीचे पाने विकून तीनही मुलांना उच्च शिक्षित बनवली आहे. नागवेलीचे एक रुपयांचे पाने विकून आपला उदारनिर्वाह चालवून आपल्या परिवाराची पूर्ण जबाबदारी अगदी नियोजन पद्धतीने पार पाडली. त्यांना तीन मुले व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. यामध्ये त्यांच्या पत्नी भागाबाई यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या खंबीर साथीने  हा संसाराचा गाडा चालविला जात आहे.  भागाबाई यांनी शेतमजुरीचे काम करून संसारात हातभार लावला. सुखदेव तेलंग्रे यांच्या मुलांनी देखील आपल्या आई-वडील यांच्या आशावर पाणी फिरू दिले नाही. आई-वडिलांच्या कष्टाचे झिंज केले आहे. मोठा मुलगा वकील तर मधला शिक्षक आणि लहान  मुलागा आयटी इंजिनिअर बनला आहे. 

Tags : Jalna,  sells, Nagavalli leaves, take care, three,  sons