Thu, Nov 15, 2018 09:43होमपेज › Jalna › मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : लोणीकर 

मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : लोणीकर 

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 29 2018 10:34PMजालना : प्रतिनिधी 

मराठा आंदोलनात सहभागी नसणार्‍या किंवा शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या आंदोलनकर्त्यांवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्यात येत आहे. गुन्हे मागे घेण्यात यावेत, असे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना व परभणी येथील पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात  मराठा संघटनांकडून मुख्यमंत्र्यांकडे निर्दोष लोकांवरील गुन्हे मागे करण्याची मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री  लोणीकर यांनाही परभणी व जालना जिल्ह्यांतील काही ठिकाणाहून अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ही बाब त्यांनी  मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने हिंसाचाराच्या आणि पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटना वगळून, अन्य ठिकाणी निरपराधांवर तसेच चुकीचे कलम लावून कारवाई करण्यात आलेल्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे पोलिस महासंचालकांना निर्देश दिल्याचे सांगितले होते.