Thu, Aug 22, 2019 08:18होमपेज › Jalna › अवैध धंदेवाल्यांना बदडले !

अवैध धंदेवाल्यांना बदडले !

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 30 2018 12:07AMपरतूर : प्रतिनिधी 

गणेशकुंज साईनाथ यात्रा महोत्सवात अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी पोलिसांनी सिंघम स्टाईलने टवाळखोर व इतरांना बदडले. पहिल्यांदाच अवैध धंद्यांना लगाम लावण्यात पोलिसांना काही अंशी यश आले. यामुळे यात्रेतून अवैध धंदे हद्दपार झाले.

यात्रेत परतूर शहराबरोबरच तालुक्यातील व शेजारील तालुक्यातील महिला भाविकांची  मोठी गर्दी असते. यात्रेतील नेहमी चालणारे अवैध धंदे, उघडे तमाशे आदी प्रकार यावेळी नसल्याने काही वर्षापासून भाविक व विशेषत: महिला भाविकांची गर्दी कमी होत असताना 56 वर्षांच्या यात्रेच्या इतिहासात प्रथमत:च पोलिसांच्या योग्य नियोजनाने यात्रेतील हरवलेली गर्दी आता वाढत चालली आहे. यात्रेत वाहतुकीचे नियम तोडणार्‍या अनेक वाहनधारकांनाही दंड आकारण्यात आला. 

उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.टी.रेंगे व पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव यांनी या ठिकाणी पोलीस चौकी उभारली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले.