Mon, May 20, 2019 18:46होमपेज › Jalna › मोदी सरकारचे चार वर्षे शेतकरी विश्‍वासघाताचे

मोदी सरकारचे चार वर्षे शेतकरी विश्‍वासघाताचे

Published On: May 28 2018 1:43AM | Last Updated: May 27 2018 11:03PMअंबड : प्रतिनिधी 

मोदी सरकार देशातील जनतेला भूलथापा देऊन सत्तेत आले, परंतु हे सरकार सर्वच आघाडीवर अयशस्वी ठरले आहे. शेतकर्‍यांचे कर्दनकाळ सरकार आहे. त्यांनी देशातील व राज्यातील शेतकरी संपविण्याचा जणू काय विडाच उचलला असल्याचे आरोप अखिल भरतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव डोंगरे यांनी  केला.

केंद्र सरकार चार वर्षेे पूर्ण होत असल्याने शनिवारी विश्वासघात दिवस पाळण्यात आला. तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी प्रदेश सचिव बाबूराव कुलकर्णी, जिल्हाउपाध्यक्ष प्रभाकर मामा पवार, तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राजपूत, उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी, डॉ. राहुल डोंगरे, प्रकाश नारायणकर, नगरसेवक जाकेर डावरगावकर, शेख रज्जाक भाई, मुस्ताक आदींची उपस्थिती होती.

प्रदेश सचिव कुलकर्णी यांनी नोटाबंदी, जीएसटी, काळा पैसा यासारख्या सर्वच निर्णयामुळे देशातील जनतेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे, परंतु हे निर्णय भाजपला मोठ्या प्रमाणात आर्थिक बळकटी देणारे निर्णय आहे. या निर्णयाच्या आड त्यांनी प्रचंड प्रमाणात काळा पैसा संचित केला. तो पैसा आता सर्वच निवडणुकात वापर करून  पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा असा  मार्ग अवलंबिला आहे. प्रास्तविक संभाजी गुडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार केदार कुलकर्णी यांनी मानले.