Sat, Feb 16, 2019 16:51होमपेज › Jalna › आरोपीकडून पिस्टलसह चार जिवंत काडतुसे जप्त

आरोपीकडून पिस्टलसह चार जिवंत काडतुसे जप्त

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 1:34AMजालना : प्रतिनिधी

बनावट नोटा प्रकरणात अटकेत असलेला आरोपी शेख समीर शेख मुन्ना (23,रा. शारदानगर, अंबड) याच्या घरातून पोलिसांनी गावठी पिस्टलसह चार जिवंत काडतूस जप्त केले.

या बाबत माहिती अशी की, मंगळवार, 24 एप्रिल रोजी विशेष कृती दलाचे यशवंत जाधव व त्यांच्या पथकाने गोलापांगरीजवळ इंंडिका कार (क्र. एम.एच.21-एएक्स 328) मधून शंभर रुपयांच्या 6 लाख 17 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. आरोपी शेख समीर शेख मुन्ना यास  न्यायालयासमोर उभे केले असता त्यास 2 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. पोलिस कोठडीदरम्यान स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिह गौर व पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांना या आरोपीने एक गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस असल्याचे सांगितले. शनिवारी पोलिसांनी अबंंड येथील त्याच्या घरातून पिस्टल व चार जिवंत काडतूस जप्त केले. 

पिस्टल व काडतुस आरोपीने कोणाकडून  व कशासाठी घेतले यासह बनावट नोटा त्याने कोणाकडून घेतल्या व कोठे कोठे वापरल्या याचा पोलिस शोध घेत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पेाकळे, अप्पर अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्रसिह गौर, विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, एम.बी.स्कॉट, फुलचंद हजारे, मारुती शिवरकर, एन.बी.कामे, गणेश जाधव आदींनी केली.