Wed, Apr 24, 2019 16:01होमपेज › Jalna › पीक कर्ज उद्दिष्ट पूर्ण करणार्‍या बँकांचा सत्कार

पीक कर्ज उद्दिष्ट पूर्ण करणार्‍या बँकांचा सत्कार

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 12:59AMभोकरदन : प्रतिनिधी

खरीप पीककर्ज वाटप 2018 -19 साठी तालुक्यातील 15 बँकांसाठी एकूण 19 हजार 760 रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्ट पूर्ण करणार्‍या बँकांच्या शाखा व्यवस्थापकांचा उपविभागीय अधिकारी हरिश्‍चंद्र गवळी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

उद्दिष्ट पूर्ततेसाठी भोकरदन तालुक्यात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी हरिश्‍चंद्र गवळी, तहसीलदार योगिता कोल्हे, तसेच सहायक निबंधक श्रीराम सोन्‍ने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पातळीवर पीक कर्ज वाटप मेळावे घेण्यात आले. ज्या बँकांना त्यांनी दिलेल्या पीक कर्ज वाटप लक्षांकाच्या 75 टक्के कर्ज वाटप दि. 14 ऑगस्ट 2018 पर्यंत केले त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्याचे कळविण्यात आले होते. यावेळी तहसीलदार योगीता कोल्हे, सहायक निबंधक श्रीराम सोन्‍ने, नगराध्यक्ष मंजूषा देशमुख, नायब तहसीलदार धर्माधिकारी, गवळी, टी.एन. गोमलाडू, बी. आर. गिरी, एस. आर. भायकर, व्ही. टी.सावळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एस. एस. पाबळे, पांडे आदींची उपस्थिती होती.

या बँकांनी केले उद्दिष्ट साध्य 

दि. 20 ऑगस्टअखेर 19760.44 लाख रुपयांपैकी 12980.67 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जवळपास 65 टक्के पीक कर्ज वाटप झाले असून 100 टक्के वाटपासाठी प्रयत्न सुरू आहेत. 3711 शेतकर्‍यांचे पीक कर्ज मागणी अर्ज होते. त्यापैकी 2801 शेतकर्‍यांना 2530.98 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

या बँकांचे समाधानकारक काम 

बँक ऑफ महाराष्ट्रने 931.41 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले. त्यांची 78.14 टक्केवारी येत आहे. याशिवाय कॅनरा बँक राजूर शाखेने 232.00, त्यांची 86.88% महाराष्ट्र ग्रामीण आन्वा 632.04 लाख, त्यांची 79.01%, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 1517.21. लाख वाटप तर त्यांची 75.21% आहे. सर्वाधिक पीक कर्ज राजूरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेने1497.00 लाख वाटप केले आहे. त्यांची 204.12 टक्केवारी एवढी आहे. -श्रीराम सोन्‍ने, सहायक निबंधक भोकरदन.