Thu, Jun 20, 2019 01:12होमपेज › Jalna › कृषिपंपांना वीज जोडणी मिळेना!

कृषिपंपांना वीज जोडणी मिळेना!

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 05 2018 12:04AMआन्वा : प्रतिनिधी 

अत्याधुनिक साधने तसेच ठिबकचा वाढलेला वापर आहे. यामुळे  कृषिपंप वीज जोडणीची महावितरण कंपनीकडे मागणी वाढली आहे. मात्र शेतकर्‍यांना वीज जोडणी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आन्वा परिसरातील 2011 पासून 500 ते 600 शेतकर्‍यांना पैसे भरूनही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. मागील काही वर्षांत  शेतकर्‍यांचा आधुनिक शेतीकडे कल आहे. आधुनिक शेतीमुळे नवनव्या औजारांचा वापर शेतीमध्ये आवर्जून केला जात आहे. त्याचे थेट फायदेही शेतकर्‍यांना मिळत आहे, मात्र अशा पद्धतीच्या शेतीसाठी शेत शिवारामध्ये वीज असणे आवश्यक आहे. विशेषत: मुबलक पाणी असतानाही केवळ कृषी पंपाची वीज जोडणी झालेली नसल्याने अनेकांना शेतीला पाणी देता येत नसल्याचे दिसून येते. भोकरदन तालुक्यात सन 2011 पासून मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना कृषी पंपासाठी वीज जोडणीची प्रतीक्षा असल्याचे दिसून येते. 2011 ते 2018 मध्ये आन्वा परिसरातील 600 शेतकर्‍यांनी कृषिपंप वीज जोडणीसाठी पैसे भरूनही त्यांना जोडणी मिळालेली नाही. त्यामुळे विहिरीत पाणी असूूून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.भोकरदन तालुक्यात 4 हजार शेतकरी वीज जोडणीसाठी पैसे भरूनही विजेची प्रतीक्षा करीत असल्याचे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. या वर्षात पैसे भरूनही वीज जोडणी न मिळालेल्या शेतकर्‍यांची संख्या वाढली. चालू वर्षी मात्र कृषी पंप वीज जोडणीकडे महावितरणचे दुर्लक्ष दिसून येते.