Fri, Apr 26, 2019 03:27होमपेज › Jalna › तूर खरेदी केंद्रास मुदतवाढ

तूर खरेदी केंद्रास मुदतवाढ

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 10:26PMजालना : प्रतिनिधी

शासनमान्य हमीभाव तूर खरेदी केंद्रावर 19 एप्रिलपासून तूर खरेदी बंद गेल्यामुळे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या 5 हजार 497 शेतकर्‍यांची तूर खरेदी बाकी होती. शासनाने यास 15 मेपयर्र्ंत मुदत वाढ दिल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान होते, परंतु नवीन नोंदणी बंद केल्याने शेतकर्‍यांचा हिरमोड झाला आहे.  जिल्ह्यातील पहिले हमीभाव केंद्र 1 फेबु्रवारीला सुरू झाले आहे. टप्प्या-टप्प्याने 15 फेबु्रवारी आठही खरेदी केंद्र सुरू झाले. या खरेदी केंद्रावर 18 एप्रिलपर्यंत नऊ हजार 152 शेतकर्‍यांनी नोंदणी केली. नोंदणी केलेल्या सहा हजार 153 शेतकर्‍यांना एसएमएसही पाठविण्यात आलेले आहे. त्यापैकी फक्त तीन हजार 653 शेतकर्‍यांकडून  34  हजार 99 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. शासनाने 19 एप्रिलपासून खरेदी बंद केल्याने पाच हजार 497 शेतककर्‍यांची तूर खरेदीचा प्रश्‍न जिल्ह्यात उभा राहिला होता. जिल्ह्यासह राज्यभरात शेतकर्‍याचे तूर खरेदी करण्याचे बाकी असल्याने शासनाने 18 एप्रिलपयर्र्र्ंत नाव नोंदणी केेलेल्या शेतकर्‍यांची तूर 15 मेपयर्र्ंत खरेदी करण्याचे आदेश जिल्हा मार्केट अधिकारी यांना दिले आहे. यामुळे बुधवारी (दि.25) पासून जिल्ह्यातील आठ ही खरेदी केंद्रावर तूर खरेदीस सुरुवात झाली आहे. 

पहिल्या दिवशी जालना व मंठा येथे तुरळक खरेदी करण्यात आली, मात्र गुरुवारी जिल्ह्यातील आठही खरेदी केंद्रांवर तूर खरेदीस सुरुवात करण्यात आली आहे.  तूर खरेदी सुरुवात झाल्याने नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे, परंतु अद्याप बर्‍याच शेतकर्‍यांकडे तूर शिल्लक आहे. नवीन नावनोंदणी बंद झाल्याने शेतकर्‍यांचा हिरमोड झाला आहे. नवीन नोंदणी सुरू करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. 

Tags : Jalna, Extension, Tur, purchase, center