Mon, Mar 18, 2019 19:18होमपेज › Jalna › अखेर गोंदी येथील जळालेले रोहित्र बदलले

अखेर गोंदी येथील जळालेले रोहित्र बदलले

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 10:49PMवडीगोद्री : प्रतिनिधी

गोंदी येथील जळालेले रोहित्र महावितरण कंपनीने अखेर बसवले.गेल्या 15 दिवसांपासून महावितरण कंपनी रोहित्र देण्यास टाळाटाळ केली होती. यासंदर्भात दैनिक ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रकाशित होताच महावितरण कंपनीने रोहित्र बसविले.

वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद होता. मागील 15  दिवसांपासून पिण्याच्या  पाण्याचा प्रश्‍न बिकट झाला होता. जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे वृत्त दि. 14 मे रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची महावितरण कंपनीने दखल घेत दि. 16 मे रोजी पाणीपुरवठ्याचे जळालेले रोहित्र गोंदी येथे पाठवून ते कर्मचार्‍यांकडून अखेर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.  पाणीपुरवठा योजनेचा  वीजपुरवठा सुरू होऊन ग्रामस्थांना पाणी मिळणार असल्याचे  ग्रामपंचायत कार्यालयातून सांगण्यात आले. बातमीची दखल घेत महावितरणने रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल गोंदी येथील सरपंच शुभांगी सोळुंके, ग्रा. पं. सदस्य   वैजिनाथ सोळुंके यांनी दैनिक पुढारीचे आभार मानले.