होमपेज › Jalna › स. भु. विद्यार्थी संसदेची निवडणूक

स. भु. विद्यार्थी संसदेची निवडणूक

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 19 2018 12:28AMजालना : प्रतिनिधी

येथील सरस्वती भुवन प्रशालेत विद्यार्थी संसदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. यावेळी लोकशाही मार्गाने विद्यार्थ्यांनी गुप्‍त मतदान केले. मतदान अधिकारी म्हणून पद्माकर इंगळे यांनी काम पाहिले.सरस्वती भुवन प्रशालेत विद्यार्थ्यांना लोकशाही प्रणाली व मतदान याबाबत माहिती करण्यासाठी गुप्‍त मतदान पद्धतीद्वारे वर्ग प्रतिनिधी, संसद प्रतिनिधी व क्रीडा प्रतिनिधी निवडण्यात आले. निवडणुकीत मतदान करून घेण्यासाठी  विद्यार्थ्यामध्ये मोठा उत्साह दिसून आला. मतदानपत्रिका व व्होटिंग बूथ शाळेत तयार करण्यात आले होते. मतदानासाठी मोठ्या रांगा लावून विद्यार्थ्यानी मतदान केले. यावेळी तुषार अहिरे, प्रल्हाद बोराडे, साईनाथ तानुरकर, प्रभाकर आंधळे, नितीन भालेराव क्रीडाशिक्षक शेख असिफ आदींनी मतदान शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी मदत केली.