Thu, Apr 25, 2019 05:53होमपेज › Jalna › दूध आंदोलनामुळे खव्याच्या उत्पादनामध्ये झाली वाढ !

दूध आंदोलनामुळे खव्याच्या उत्पादनामध्ये झाली वाढ !

Published On: Jul 29 2018 1:37AM | Last Updated: Jul 29 2018 1:30AMजालना : प्रतिनिधी 

गत आठवड्यात दूध आंदोलनामुळे शेतकर्‍यांच्या दूध विक्रीवर मोठा परिणाम झाला. याचा शेतकर्‍यांनी फायदा घेत खवा निर्मितीवर भर दिला आहे. जालना बाजारपेठेत दररोज एक क्विंटल खव्याची आवक वाढली आहे. गत महिन्यात हिच आवक 40 ते 60 किलो दरम्यान होती. प्रतनुसार खव्याचे भाव दीडशे ते दोनशे प्रतिकिलो दरम्यान आहेत. शहरा खवा विक्रीची वेगळी बाजारपेठ आहे. 

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या दुधाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने ते व्रिकी करण्याऐवजी दुधाचा खवा करू न शेकडो क्विंटल खव्याची जालनासह इतर  बाजारपेठेत विक्री करण्यात येते. दुधापेक्षा खव्याचा दर शेतकर्‍यांना परवडत असल्याने दूध संकलन केंद्रात दूध देण्याऐवजी शेतकरी घरीच खवा निर्मिती करत आहे. आगमी काळातील श्रावण महिना तसेच सण उत्सव पाहता खवा निर्मिती तसेच विक्रीतून चांगली उलाढाल होण्याचा अंदाज शेतकरी तसेच व्यापारी व्यक्‍त करत आहेत. 

शेतकर्‍यांच्या दुधाला मागणी मोठ्या प्रमाणात असले तरीही दुधाला शेतकरी अथवा उत्पादकांना भाव कमी मिळतो. काही वेळा ग्राहकही आढेवेढे घेतात. परिणामी दूध वाया जाते  अथवा कमी भावात विक्री करावे लागते. मागतील तो भाव ग्राहक देत नाहीत. उलट दुधात पाण्याचे प्रमाण असल्याचे सांगत दूध उत्पादक शेतकर्‍यांचा भाव पाडला जातो. 

त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी दुधापासून खवा करण्याच्या व्यवसायाकडे आकर्षित झाले आहेत. जालना तालुक्यातील इंदेवाडी, जामवाडी, काजळा, सिरसवाडी, नागेवाडी, वाघ्रुळ, गोंदेगाव आदी अनेक गावांतून जालना खवा बाजारपेठेत खवा विक्रीसाठी येत आहे. दूध आंदोलनानंतर यात वाढ होत असल्याचे मोठ्या विक्रेत्यांनी सांगितले.