Fri, Apr 19, 2019 11:57



होमपेज › Jalna › भय्यू महाराजांच्या निधनाने राजकीय क्षेत्राला धक्का

भय्यू महाराजांच्या निधनाने राजकीय क्षेत्राला धक्का

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 1:33AM



जालना : प्रतिनिधी

आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्ह्याचे राजकीय क्षेत्र हादरले. भय्यू महाराज व जालन्याचा ऋणानुबंध हा घट्ट होता. विविध कार्यक्रमांसाठी ते जालन्यात यायचे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हॉटेलचे उदघाटन असो की, स्वातंत्र्यसैनिक रामभाऊ राऊत यांच्या पुतळ्याचे अनावरण अथवा भाईश्री यांच्यातर्फे आयोजित सामूहिक सोहळा असो भय्यू महाराज या कार्यक्रमाना आवर्जुन उपस्थित राहात होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर व भय्यू महाराज यांचा घनिष्ठ स्नेह असल्याने ते नेहमी खोतकर यांच्याकडे येत होते. खोतकर यांच्या दर्शना हॉटेलच्या उद्घाटनास ते उपस्थित होते. शहरातील राऊत कुटुंबीयांची भय्यू महाराजांवर श्रध्दा होती. त्यांच्या आग्रहावरून भय्यू महाराज स्वातंत्र्यसैनिक  स्वर्गीय रामभाऊ राऊत यांच्या बसस्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते जालन्यात आले होते. सद‍्गुरु सेवा समिती व भाईश्री यांच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्यासही भय्यू महाराज उपस्थित होते. काँगे्रसचे जुने नेते पंडितराव हर्षे व बाळासाहेब  पवार यांचे चिरंजीव मानसिंग पवार यांच्याशी भय्यू महाराजांचे स्नेह संबंध होते.