Wed, Feb 20, 2019 08:41होमपेज › Jalna › खड्ड्यांमुळे रस्त्यावरच प्रसूती

खड्ड्यांमुळे रस्त्यावरच प्रसूती

Published On: Feb 05 2018 2:03AM | Last Updated: Feb 04 2018 11:20PMतीर्थपुरी : प्रतिनिधी

प्रसूतीसाठी दवाखान्यात घेऊन जात असतानाच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली. त्यानंतर बाळही बेशुद्ध पडले. त्याला काही काळ ऑक्सीजनवर ठेवावे लागले. हा खळबळजनक प्रकार रविवारी घनसावंगी तालुक्यातील मुरमा ते भोंगाव रस्त्यावर घडला. 

रविवारी बानेगाव येथील सुजाता पानखडे  (22) यांना बानेगाव येथून प्रसूतीसाठी  तीर्थपुरी येथे  घेऊन जात असताना रस्त्यातच प्रसूती झाली. प्रसूतीनंतर  महिला व  बाळाला टाटा सुमोतून घेऊन  जात असताना खड्ड्यात गाडी उडाल्याने बाळाला मार लागला. त्यामुळे  बाळ बेशुद्ध पडले. महिला व बाळास तीर्थपुरी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. बाळाला दोन तास ऑक्सीजनवर ठेवल्यानंतर बाळ शुद्धीवर आले. डॉ. दीपक उढाण यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत थोडा जास्त वेळ लागला असता तर बाळ जिवंत राहणे अवघड झाले असते.