Mon, Sep 24, 2018 05:12



होमपेज › Jalna › गांधी हीच भारताची खरी ओळख : डॉ. विश्‍वजित रॉय

गांधी हीच भारताची खरी ओळख : डॉ. विश्‍वजित रॉय

Published On: Feb 16 2018 2:30AM | Last Updated: Feb 16 2018 2:20AM



जालना : प्रतिनिधी

संपूर्ण जगात भारताची ओळख हीच फक्त गांधी आहे. गांधी हाच आमचा खरा ब्रँड असल्याचे प्रतिपादन ओडिशा येथील डॉ. विश्‍वजित रॉय यांनी केले.

येथील जेईएस महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने 14 व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात सकाळच्या सत्रात गांधी कोण होते ? या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले की, संपूर्ण जगात भारताची ओळख गांधी हीच आहे. जगातील प्रत्येक देशात तेथील गांधी तयार झाले आहे. अनेक देशांच्या महापुरुषांचे आदर्श गांधी आहेत. गांधी हे एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे आणि संपूर्ण विश्‍व या विचाराकडे आशादायी नजरेने पाहत आहे. म्हणूनच युनोने गांधी जयंती विश्‍वशांती दिवस म्हणून घोषित केला आहे. जगाला आपल्या आचरणातून गांधींनी आदर्श दिला म्हणून मार्टिन ल्यूथर किंग, बराक ओबामा, आँग-सांस-की अशा कितीतरी लोकांचा आदर्श गांधीच आहेत.

गांधींनी शत्रुंवरही तेवढेच प्रेम केले जेवढे मित्रांवर केले म्हणूनच त्यांना ज्यांनी जास्त त्रास दिला तो जनरल स्मट्स या इंग्रज अधिकार्‍याला गांधींनी भेट दिलेली चप्पल तो पायात न घालता डोक्यावर घेऊन फिरतो. गांधींचे जीवन एक प्रचंड आव्हानात्मक होते. त्यावेळी इंग्रज शत्रू होते, मात्र  आज तरुणांसमोर विषमता हे मोठे आव्हान आहे. देशातील वाढत चाललेली आर्थिक विषमता, गरिबी हे संपविण्याचे आव्हान आहे आणि हे गांधी विचारांने पूर्ण होऊ शकते असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या आव्हानाला गांधी विचारानेच तरुणांनी तोंड द्यावे असा संदेश त्यांनी यावेळी तरुणांना दिला.
  यावेळी डॉ. उद्धव थोरवे, डॉ. राजक्रांती वलसे, डॉ. प्रतिभा श्रीपत, प्रा.पल्लवी भावसार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महावीर सदावर्ते यांनी केले. तर आभार डॉ. प्रवीण चंदनशिवे यांनी मानले.