होमपेज › Jalna › डॉ. तोगडिया यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन

डॉ. तोगडिया यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन

Published On: Feb 12 2018 1:50AM | Last Updated: Feb 12 2018 12:31AMबदनापूर : प्रतिनिधी

विश्‍व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या हस्ते शुक्रवार (दि. 9) रात्री अ‍ॅड. बालाजी वाघ यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी तोगडिया यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

येथील अ‍ॅड. बालाजी वाघ यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त तोगडिया आले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गट नेते संतोष पवार, शंकर गायकर, संजयअप्पा बारगाजे, ललित चौधरी, हेमंत त्रिवेदी, आनंद पांडे, महेश पाटील, चद्रकांत घोलप, भगवान मात्रे, महेश लड्डा, प्रवीण बुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी नामदेव बोराडे, अविनाश देशमाने यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.