Sun, Jul 21, 2019 12:41होमपेज › Jalna › उद्योगांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : खोतकर

उद्योगांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : खोतकर

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 05 2018 11:19PMजालना : प्रतिनिधी

जालना जिल्ह्याला उद्योगामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उद्योगाच्या माध्यमातून बेराजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊन उद्योग टिकून राहण्याबरोबरच भरभराटीस येण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. औद्योगिक क्षेत्रातील विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  खोतकर बोलत होते.

व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भास्करराव आंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, ए.जे. पाटील बोराडे, घनश्याम गोयल, सुभाष अजमेरा, सुनील रायठठ्ठा, विजय मित्तल, आदींची प्रमुख उपस्थिती होती.  खोतकर म्हणाले की, जालना येथील उद्योगाला सातत्याने मदत करण्याचीच आपली भूमिका राहिली आहे.  गतकाळात अनेक कारणांमुळे जालना उद्योगक्षेत्र अडचणीत आले होते.  

अशा वेळेत उद्योगाला कायमस्वरूपी वीज मिळावी तसेच वीजबिलात सूट मिळावी तसेच उद्योग टिकून राहावा, यासाठी आपण वैयक्तिकरीत्या मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न केले. औरंगाबाद येथे मोठी औद्योगिक वसाहत असून, अनेक मोठ-मोठ्या उद्योगाचा ओढा औरंगाबाद येथील वसाहतीकडेच आहे.  जालना येथे मोठ-मोठे उद्योग यावेत, यासाठी आपण उद्योगमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत असून, येणार्‍या काळात जिल्ह्यात नवीन उद्योग येतील अशी, आशा खोतकर यांनी  व्यक्त केली. 

 

Tags : Jalna, Jalna news, industries, Arjun Khotkar,