Thu, Sep 20, 2018 04:14



होमपेज › Jalna › दिंडी मार्गाला आमचा विरोध नाही

दिंडी मार्गाला आमचा विरोध नाही

Published On: Feb 05 2018 2:03AM | Last Updated: Feb 04 2018 11:16PM



परतूर : प्रतिनिधी

शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाला शेतकरी संघटनेचा कोणताही विरोध नाही. या रस्त्यासाठी ज्या शेतकर्‍यांची जमीन संपादित होणार आहे, त्यांना त्याचा योग्य मोबदला द्यावा, हीच मागणी असल्याचा निर्वाळा संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी दिला.

परतूूर तालुक्यातील  वाटूर फाटा येथे टाळ मृदुंग आणि विणाच्या गजरात पांडुरंगाचा व गजानन महाराजांचा जयघोष करत वारकरी शिष्टमंडळाने  खा. शेट्टी यांना निवेदन दिले.  या निवेदनात दिंडी मार्गात विनाकारण राजकारण आणले जात असून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही मूठभर दिंडीमार्ग रोखण्याचे काम करत आहे. तेव्हा या विकासाच्या कामात अडथळा आणू नये. वाटूर,परतूर, आष्टी,  लोणी, माजलगाव हा रस्ता 1972 साली झाला. त्यानंतरच्या काळात त्याला राज्यमार्गाचा दर्जाही मिळाला आहे.  त्यामुळे हा रस्ता होणे वारकर्‍यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मुळात पन्नास, साठ वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्याचा मोबदला आता देता येत नसेल तर अशा शेतकर्‍यांनी कोर्टात जाऊन आपली बाजू मांडावी. अखंड महाराष्ट्राचे दैवत असणारे पंढरपूर हा दिंडी मार्गात अडथळा निर्माण करू नये, असे निवेदनात म्हटले आहे. या प्रसंगी हभप रामकिशन नानवटे, हभप भरत खोसे, हभप रामराव ढवळे, बबन महाराज, पांडुरग महाराज, बंडू धुपा पवार, हभप साळिकराम नानवटे, प्रेमसिग महाराज, ज्ञानेश्‍वर सोंळके, कारभारी सातपुते, रामदास सुरनर, बालचंद्र बच्छिरे, दगडोबा चांदणे, अशोक दाभाडे, रमेश वायाळ, दिनकर काकडे, मच्छिंद्र राउत, दत्ता महाराज कुटनिकर भास्कर महाराज टकले, दिनकर काका, ओमप्रकाश जाधव, आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.