Wed, Apr 24, 2019 21:40होमपेज › Jalna › माव शिवारात गांजाची शेती उद्ध्वस्त

माव शिवारात गांजाची शेती उद्ध्वस्त

Published On: Jul 02 2018 1:43AM | Last Updated: Jul 01 2018 10:32PMआष्टी : प्रतिनिधी

परतूर तालुक्यातील आष्टी-परतूर रोडवर माव शिवारात शुक्रवारी पोलिसांनी सायंकाळी केलेल्या कारवाईत शेतात उसाच्या फडात लावलेल्या 27 हजारांचा गांजा जप्त करण्यात आला. 

आष्टी-परतूर रस्त्यावर असलेल्या माव शिवारात मारूती लक्ष्मण आढे याने उसाच्या  शेतात गांजाची झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर सहायक पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी शुक्रवारी सायंकाळी शेतात धाड टाकली. त्या ठिकाणी ओली गांजाची 20 झाडे, त्याचे वजन 23 किलो 500 ग्रॅम व 27 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी मारुती आढे याच्याविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके हे करीत आहेत. पोलिसांनी टाकलेल्या दुसर्‍या छाप्यात आष्टी-पाथरी रस्त्यावर असलेल्या दोन हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून 1720 रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी सिद्धार्थ ज्ञानेश्‍वर जाधव व गोविंद सुधाकर सोळंके यांच्याविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.