Fri, Jul 19, 2019 07:06होमपेज › Jalna › दाभोलकरांच्या मारेकर्‍यांवर कारवाईची मागणी

दाभोलकरांच्या मारेकर्‍यांवर कारवाईची मागणी

Published On: Aug 21 2018 1:35AM | Last Updated: Aug 21 2018 12:31AMजालना : प्रतिनिधी

महाराष्ट्र अंनिसचे संस्थापकीय कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणा़र्‍या मुख्य सूत्रधारासह सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

 डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन सोमवारी (दि.20)  पाच वर्षे पूर्ण झाली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच  सूत्रधारास फाशीची शिक्षा देण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यातील सनातन व हिंदू जनजागर संस्थेवर करडी नजर ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.  निवेदनावर समितीच्या जिल्हाध्यक्षा जिल्हाध्यक्षा आगलावे, संभाजी ब्रिगेडचे संतोष गाजरे, एसआयएफचे अनिल मिसाळ व जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर गायकवाड, जिल्हा प्रधान सचिव ज्ञानेश्‍वर गिराम, अंनिसचे पदाधिकारी प्रशांत वाघ, मनोहर सरोदे, संतोष मोरे, सुभाष कांबळे, विनोद बरवार, संजय हेरकर, अनुराधा हेरकर,अच्युत मोरे, माया गायकवाड, डॉ. मच्छिंद्र बदर, राजेंद्र साबळे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.