Thu, Aug 22, 2019 04:51होमपेज › Jalna › इंडिया बँकेत पीककर्ज वाटपात दुजाभाव...!

इंडिया बँकेत पीककर्ज वाटपात दुजाभाव...!

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 13 2018 11:49PMपरतूर : प्रतिनिधी

येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँक शाखेत गरजू शेतकरी यांना पीक कर्ज वाटपात दुजाभाव चालू असून एजंटामार्फत जास्तीचे पीक कर्ज मंजुरी होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. याबद्दल शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.

सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर करून कर्ज मुक्‍तीतून बाहेर काढून त्यांना उभारीसाठी नव्याने कर्ज वाटप करण्याचे बँकांना सूचना दिल्या. मात्र बँकेकडून पीक कर्ज वाटपात सर्रास दुजाभाव चालू असून लपूनछपून एजंटामार्फत काही ठराविक शेतकरी यांना वाढीव कर्ज मंजुरी देण्याचा प्रकार चालू असल्याने गरजू शेतकर्‍यांवर अन्याय होत असून बँकेच्या कारभारला शेतकरी कंटाळले आहेत. पीक कर्जासाठी एक एक महिना अगोदर कागदपत्रे अर्ज देऊनही कर्ज मिळत नसल्याने शेतकरी बँकेच्या दाराला खेटे मारत असून बँकेचे अधिकारी भेटत नसल्याने कोणाकडे दाद मागायची अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे. एजंटामार्फत गेल्यास त्वरित कर्ज मंजूर मिळवून पैसे मिळत आहेत. सर्वसामान्य शेतकरी यांना नियमाची कात्री लावून कर्ज वाटप केले जाते. शासनाकडून कर्ज माफी मिळालेल्या शेतकर्‍यांना अर्धे कर्ज मिळत नसल्याने संताप व्यक्‍त होत आहे. याबाबत बँक शाखा व्यवस्थापक यांच्याशी बँकेत जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

पीक कर्ज वाटप करताना काही शेतकर्‍यांना एकरी वीस हजार रुपये कर्ज देऊन बोळवण करणे चालू आहे तर काही शेतकरी यांना दलालामार्फत एकरी पंचवीस हजारांपासून पसत्तीस हजार रुपयांपर्यंत वाटप चालू असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.