Thu, May 23, 2019 04:18होमपेज › Jalna › मराठा समाजाच्या युवकांचे समुपदेशन

मराठा समाजाच्या युवकांचे समुपदेशन

Published On: Aug 14 2018 1:28AM | Last Updated: Aug 14 2018 1:24AMजालना ः प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या ज्वलंत विषयावर शासनाची विश्‍वासार्हता दिसत नाही. त्यामुळे नैराश्यग्रस्त तरुण मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहेत, हे थांंबवावे यासाठी मराठवाड्यातील 30 गावांचा दौरा करण्यात येऊन तरुणांचे समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली.

येथील हॉटेल गॅलेक्सी येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाधव बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, संजय लाखे पाटील, नगरसेवक विष्णू पाचफुले, प्रशांत वाढेकर आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना जाधव म्हणाले की, आम्ही करीत असलेल्या समुपदेशनामुळे काही तरुण नैराश्यातून बाहेर पडले आहे. हे काम  शासनाने हाती घेणे गरजेचे आहे. आज आंदोलनामुळे शासनाची परिस्थिती भांबावल्यासाारखी झाली आहे. जालना जिल्ह्यातूनही उद्यापासून समुपदेशन सुरू होणार आहे. मराठा समाजाचा सर्वच राजकीय पक्षांवर रोष आहे.आंदोलनादरम्यान निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, हे चुकीचे आहे.गुन्हे दाखल करून आंदोलन संपणार नाही. लातूर येथे योगेश मोहिते याने मंत्रालयाच्या तिसर्‍या मजल्यावरून आत्महत्या करण्याचे ठरविले होते, मात्र आमच्या समुपदेशनानंतर त्याने आता मरण्याचा नव्हे तर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाने एकत्र येऊन राजकीय व्होट बँक बनविली पाहिजे असे आपले मत आहे.

औरगाबाद येथील वाळूजमध्ये दंगल करणारे दुसरेच होते. मात्र त्याचे बिल आमच्या नावावर फाडण्यात आले. पालकमंत्र्यानी 15 ऑगस्टचे झेंडावंदन करू नये, असे आमचे मत आहे.जिल्ह्यात 32 हजार तरुणांनी मुंडण केले असून त्यात जाफराबाद तालुक्यातील साडेचार हजार तरुणांचा समावेश आहे. संपूर्ण देशात असे मुंडण आंदोलन कोठेच झाले नसून याची लिमकाबुकमध्ये नोंद करण्यासाठी सर्वांना मंगळवारी जालन्यात बोलावून त्यांचे रजिस्टे्रशन करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या आमदार व खासदारांच्या घरासमोर आरक्षणासह विविध विषयांवर तीन तास धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संजय लाखे पाटील यांनी दिली.