होमपेज › Jalna › संविधान अबाधितच राहणार : खा. दानवे

संविधान अबाधितच राहणार : खा. दानवे

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 11 2018 11:02PMजाफराबाद : प्रतिनिधी

संविधानाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून, त्यावर कुणीही विश्‍वास ठेवू नये, संविधान अबाधितच राहील, त्यात कुठलाच बदल केला जाणार नाही; मात्र याबाबत उठत असलेल्या अफवांवर कुणीही विश्‍वास ठेवू नये, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. 

भाजप युवा मोर्चा तथा भीमजयंती उत्सव समितीच्या वतीने आदर्श शिंदे भीमगीत नाईट्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. हर्षवर्धन जाधव, निर्मला दानवे, आ. संतोष दानवे, जि. प. सदस्या आशा पांडे, भाजप तालुकाध्यक्ष गोविंदराव पंडित, पं. स. सभापती साहेबराव कानडजे, संतोष लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.दानवे म्हणाले की, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा डॉ. बाबासाहेबांनी मूलमंत्र दिलेला असून त्यांचा हा विचार अंमलात आणल्यास माणूस जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहू शकत नाही. या महामानवाने जगात समता, बंधुत्वता नांदावी यासाठी आपला देह जीवनभर झिजवला. दलित, वंचित, कामगार, कष्टकरी, उपेक्षित जनतेच्या न्यायहक्कासाठी ते आयुष्यभर कार्य करीत राहीले. त्यामुळे आपल्याला शिक्षण आरक्षण, मतदानाचा अधिकार मिळाला असल्याचे ते म्हणाले. यावेळी आ. संतोष दानवे यांचेही भाषण झाले. 

Tags : Jalna, Constitution, unchanged, MP Danve