Tue, Jun 25, 2019 15:23होमपेज › Jalna › चार नगर परिषदेच्या विषय समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व

चार नगर परिषदेच्या विषय समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व

Published On: Jan 03 2019 12:35AM | Last Updated: Jan 03 2019 12:35AM
जालना : प्रतिनिधी

नगर परिषदेमधील विषय समितीच्या  विद्यमान सभापतींचा एक वर्षाचा नियोजित कार्यकाळ पूर्ण होत असल्याने नूतन सभापतींची निवड बुधवारी (दि. 2) करण्यात आली.  जालना, अंबड, भोकरदन आणि परतूर या चारही  ठिकाणी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व दिसून आले. जालना व परतूर येथे बिनविरोध निवड करण्यात आली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती व सभापतींची निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. अपक्षेप्रमाणे काँग्रेसचे वर्चस्व नगरपरिषदेत असल्याने चारही ठिकाणी बाजी मारल्याचे दिसून आहे. जालना पालिकेत आघाडीने वर्चस्व कायम राखले आहे. यात तीन काँग्रेस व दोन राष्ट्रवादी काँग्रसेच्या सभापतीची निवड बिनविरोध झाली.

भोकरदनमध्ये काँग्रेसचे वरचष्मा

नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या निवडीत सत्ताधारी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपला ही स्थान मिळाले आहे. 
नगर परिषदेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हरिचंद्र गवळी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापतीची निवड करण्यात आली. सभेसाठी नगराध्यक्षा मंजुषा  राजेंद्र देशमुख, उपाध्यक्ष  इरफान,  संतोष अन्नदाते, रणविरसिंह देशमुख सदस्य व यांच्यासह एकुन 18  सदस्य उपस्थित होते. सभा कामकाजासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  अमितकुमार सोंडगे, आडे व्ही.जी,  गणेश बैरागी, समी बैग यांनी मदत केली. सार्वजनिक बांधकाम समितीमध्ये वंदना तळेकर, दीपक बोर्ड, सदस्य म्हणून अन्नदाते संतोष रघुनाथराव, विजय इंगळे, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य समितीत  पूजा दीपक तळेकर,  रणवीरसिंह जाधव,  निर्मलाबाई भिसे, राहुलसिंग ठाकूर सदस्यपदी  पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समितीत   शेख इऱफान निजमोद्दीन,  संतोष अन्नदाते,  शेख कदीर शेख शब्बीर,  विजय इंगळे,   नियोजन आणि विकास समितीत पठाण नसीमखॉ बशीरखाँ,  केशान अमिनाबेगम अमर,  शेख कदीर शेख शब्बीर, आशा माळी यांची निवड करण्यात आली.

परतूर पालिका निवड बिनविरोध

पालिकेची स्थायी समिती निवड बिनविरोध करण्यात आली. यात  काँग्रेस तीन व भाजपप्रणीत शहर आघाडीच्या तीन सभापतींची निवड करण्यात आली. 
विषय समिती सभापती निवडीसाठी सकाळी 11 वाजेपासून निवडणूक प्रक्रियेला  पालिका सभागृहात सुरुवात झाली. 16 निर्वाचित सदस्य आणि 2  नामनिर्देशित सदस्य सभेला उपस्थित असल्याने गणपूर्ती झाली असल्याची खात्री करून कामकाजाला सुरुवात करण्यात आली. शहर विकास आघाडीचे मोहनकुमार अग्रवाल आणि काँग्रेसचे गटनेते बाबुराव हिवाळे  यांनी सदर निवडणुकीत विषय समित्यांची निवड न करता केवळ स्थायी समिती सदस्यांची निवड करण्याबाबत पीठासीन अधिकार्‍यांना लेखी कळविल्याने विषय समित्यांची निवड करण्यात आली नाही.  6 सदस्य निवडण्यासाठी नामनिर्देशन सादर करण्यात आले. यात अध्यक्षा नगराध्यक्षा विमल जेथलिया, मोहनकुमार अग्रवाल, संदीप बाहेकर, राहिमोद्दिन कुरेशी,  रेखा प्रकाश चव्हाण आदींचा समावेश आहे.

जालना : काँग्रेस तीन, राष्ट्रवादी काँग्रेस दोन 

नगर पालिकेच्या विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी केशव नेटके होते. सभेस नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगरध्यक्ष राजेश राऊत, मुख्यधिकारी संतोष खांडेकर यांची उपस्थिती होती. सभेच्या सुरूवातीस विषय समितीच्या सभापती पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात आले. 

राष्ट्रवादीचे वर्चस्व

या निवडणुकीत प्रत्येक सभापती पदासाठी एकच नामनिर्देशनपत्र आल्याने निवडणुक बिनविरोध करण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकतफी  वर्चस्व असल्याने सर्व विषय समित्या अपेक्षेप्रमाणे निवड झाली. राष्ट्रवादीकडील स्वच्छता समिती काँग्रेसकडे गेली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व 
दिसून आले.