Sat, May 30, 2020 05:16होमपेज › Jalna › दोन वर्षांपासून सुरू असलेले महिला रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे

दोन वर्षांपासून सुरू असलेले महिला रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 1:23AMजालना : प्रतिनिधी

गत दोन वर्षांपासून गांधी चमनवरील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे काम सुरू आहे. हे काम जवळपास 90 टक्केपूर्ण झाले असून येत्या सहा महिन्यांत नूतन इमारतीत हे रुग्णालय सुरू होईल, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची इमारत निजामकालीन असून त्यास 140 वर्षे जुनी असल्यामुळे मोडकळीस आली होती. या रुग्णालयाचे एकूण क्षेत्रफळ 7174,96 चौरस फूट आहे. मात्र इमारत निजामकालीन असल्याने पावसाळ्यात जागोजागी गळत असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गौरसोय होत. रुग्णालय दुरुस्त करण्याच्या योग्यतेचे नसल्याने अखेर ही निजामकालीन इमार जमीनदोस्त करण्यात आली. तीन वर्षांपूर्वी शंभर खाटांच्या उभारणीसाठी 70 कोटी 45 कोटी रुपयांचे दोन स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यानुसार 2015 शेवटी रुग्णालयाच्या इमातीचे काम सुरू करण्यात आले. आता या रुग्णालयाचे काम जवळपास 90 टक्केपूर्ण झाले आहे. किरकोळ काम येत्या पाच-सहा महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर इमारतीचा वापर सुरू होईल.

शंभर खाटांच्या या रुग्णालयात मुख्य इमारत, धर्मशाळा, उपाहारगृह, 70 क्वॉर्टर्सचा समावेश आहे. मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, बाहेरील फिनिशिंगचे काम सुरू आहे. तसेच समोरील भागातून सिमेंट गट्टू बसविण्यात येत आहे. क्वॉर्टर्सचे काम पूर्ण झाले आहे. येथील रस्त्यांचे काम, विद्युत खांबसह रंग-रंगोटीचे कामही पूर्ण झाले आहे. पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.