होमपेज › Jalna › दोन हरभरा खरेदी केंद्र बंद

दोन हरभरा खरेदी केंद्र बंद

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 1:14AMजालना : प्रतिनिधी

शासनाच्या हरभरा खरेदी प्रक्रियेला 13 जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे गुरुवार (दि.7) पासून जिल्ह्यात हरभरा खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली. परंतु  भोकरदन आणि परतूर येथे जागेअभावी ही हरभरा खरेदी बंद होती.  पहिल्या दिवशी जवळपास 375 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला होता. 

शासनाच्या तूर व हरभरा खरेदी प्रक्रियेला शासकीय यंत्रणांचा बेताल कारभार व त्यांचे खासगी यंत्रणेशी असलेले साटेलोटे यामुळे खीळ बसली होती. जिल्ह्यातील गोदामांमध्ये तूर साठवण्यात आली होती. यामुळे हरभरा साठवण्यासाठी जागाच नव्हती; परिणामी हरभरा खरेदीची प्रक्रिया संथ होती, असाही आरोप झाला. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. हरभर्‍यासाठी 3 हजार 551 शेतकरी प्रतीक्षेत आहेत. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने  जालना, भोकरदन, अंबड आणि परतूर हरभरा खरेदी केंद्रावार  9 एप्रिलपासून खरेदी सुरू करण्यात आली आहे. प्रारंभापासून हरभरा खरेदीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.