Sat, Jul 20, 2019 10:37होमपेज › Jalna › आन्वा येथे पाण्यासाठी मुलांची कसरत

आन्वा येथे पाण्यासाठी मुलांची कसरत

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 24 2018 11:19PMआन्वा : प्रतिनिधी 

भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे पाणीटंचाई तीव्र झाली आहे. पाणीटंचाईच्या झळा लहान बालकांनाही बसू लागल्याने बाटलीभर पाण्यासाठी ते जीव धोक्यात घालून पाणी मिळवीत आहेत.आन्वा गावासह परिसरात  उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात परिसरातील गावात  पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणीस्त्रोत आटल्याने गावकर्‍यांना भटकंती करावी लागत आहे. गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चार ऐवजी दोन टँकर मंजूर केले. या टँकरद्वारे पुरवठा सुरू असून गावातील पाणीटंचाई काही प्रमाणात दूर झाली आहे. टँकरची संख्या कमी असल्याने गावातील टंचाईने भयानक रूप धारण केले आहे. लहान मुुलांसह महिला व नागरिकांना पाण्यासाठी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणार्‍या योजनांचे जलस्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. ग्रामस्थांना शेतातून पाणी आणावे लागत आहे.