Sun, Jun 16, 2019 08:12होमपेज › Jalna › खैरेंची हार म्हणजे माझा पराभव : उद्धव ठाकरे

खैरेंची हार म्हणजे माझा पराभव : उद्धव ठाकरे

Published On: Jun 10 2019 1:32AM | Last Updated: Jun 10 2019 12:37AM
जालना : प्रतिनिधी 

औरंगाबादमध्ये  शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची झालेली हार त्यांची नसून, माझा पराभव आहे. औरंगाबादला पुन्हा भगवा फडकवणार, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली.

जालना तालुक्यातील साळेगाव येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चारा छावणीतील शेतकर्‍यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद किटचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आरोग्य व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा आम्हाला यश मिळेल, याची मला खात्री होती. त्यावेळी काही जणांनी विविध अंदाज बांधत शिवसेनेला कमी जागा मिळणार असल्याचे सांगितले होते. मात्र, तुमची ताकद व शिवसैनिकांनी केलेल्या कामावर माझा विश्‍वास होता. शिवसैनिक काम करतात म्हणून तुमचा विश्‍वास आहे. महाराष्ट्रात औरंगाबादचा निकाल आमच्याविरोधात गेला. मात्र, तेथे चंद्रकांत खैरे यांचा नव्हे तर मी माझा पराभव झाल्याचे समजतो. औरंगाबादला पुन्हा भगवा फडकवणार, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.