Mon, Jul 22, 2019 01:31होमपेज › Jalna › कार उलटून अपघात; एक ठार, तीन जखमी

कार उलटून अपघात; एक ठार, तीन जखमी

Published On: Jul 31 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 11:36PMबदनापुर : प्रतिनिधी 

मुंबईहून जालनामार्गे देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) येथे देवदर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची कार उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (दि. 30) घडला. औरंगाबाद रस्त्यावरील सारथी पेट्रोलपंपाजवळ घडला. 

मुंबईहून हसमुख धनराज जैन (30), महावीर दुलचंद जैन (30), निलम संदीप जैन (28), अमृत दुलचंद जैन (70) यांच्यासह तीन मुले कारने (एमच-04 एचएन-5779) जालनामार्गे देऊळगाव राजाकडे देवदर्शनासाठी जात होते. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार उलटली. 

यात हसमुख जैन (चालक) ठार झाले, तर महावीर, निलम आणि अमृत जैन जखमी झाले. कारमधील मुले सुखरूप आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी एस. जी. कांयदे व काळे घटनास्थळी दाखल झाले.