Thu, Apr 25, 2019 13:56होमपेज › Jalna › ‘बोगसांनी’च घेतला शिक्षक बदलीचा लाभ

‘बोगसांनी’च घेतला शिक्षक बदलीचा लाभ

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 19 2018 11:25PMजालना ः प्रतिनिधी

शिक्षक बदलीत काही शिक्षकांनी संवर्ग एक व दोनमधून बोगस लाभ घेतल्याचे  कागदपत्रांची तपासणी करताना समोर आले. जवळपास 56 शिक्षकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याची माहिती  विश्‍वसनी सूत्रांनी दिली.

 मे महिन्यात जिल्ह्यात झालेल्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत प्रंचड गोंधळ उडाला होता.  या प्रक्रियेत 217 शिक्षक विस्थापित झाले तर 12 शिक्षक रँडम राऊंड मध्ये झाले होेते.  हे सर्व संवर्ग एक व दोनमध्ये बोगस लाभ घेतलेल्या शिक्षकांमुळेच या शिक्षकांना दूरवरच्या शाळेवर जावे लागले होते. 

मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी गुरुवारी (19) रोजी स्वतः संवर्ग एक व दोनमधून बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी केली. यात संवर्ग एकमध्ये एकूण 93 शिक्षकांपैकी 36 शिक्षक अपात्र आढळले. त्यातील काही जणांवर वेतनवाढ कपात करून पुढील रँडम राउंडमध्ये टाकायची शिफारस  करण्यात आली आहे. तर संवर्ग दोन मध्ये 108 शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. यात 20 शिक्षकांनी चुकीचे अंतर, इंग्रजी शाळेत जोडीदार नोकरीस दाखविला होता.

या सर्वांवर कारवाई प्रस्थापित केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी शासन निर्णयाचे उल्लंघन  करणार्‍या शिक्षकांवर 27/2 च्या शासन निर्णयानुसार संवर्ग दोन म्हणजेच तीस किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या पती पत्नींना एकत्रीकरणांतर्गत तीस किलोमीटरच्या आत  आणण्याचे सांगितलेले आहे. अर्ज भरताना हे अंतर तीस किलोमीटर पेक्षा जास्त टाकल्यास अर्ज ऑनलाइन भरला जात होता. बदलीच्या या सर्व प्रक्रियेची चर्चा शिक्षकांत जोर धरत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे.