Thu, Aug 22, 2019 10:15होमपेज › Jalna › ब्लिचिंग पावडरचे 83 पैकी 23 नमुने अप्रमाणित

ब्लिचिंग पावडरचे 83 पैकी 23 नमुने अप्रमाणित

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 12 2018 1:40AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात जोरदार पावसाला अद्याप सुरुवात झालेली नसतानाच दूषित पाणी प्रश्‍नाने डोके वर काढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील 900 ग्रामपंचायतींपैकी 83 ग्रामपंचायतींनी पाठविलेले ब्लिचिंग पावडरच्या नमुन्यांपैकी 23 नमुने जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या तपासणीत अप्रमाणित आढळले आहेत. 

जिल्ह्यात जून महिन्यात पाणी तपासणीचे 1400 नमुने जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेस प्राप्‍त झाले. या नमुन्यांपैकी 421 पाणी तपासणी नमुने दूषित आढळले. ग्रामीण भागात 1133 पैकी 377  तर शहरी भागात 267  पैकी 44 नमुने दूषित असल्याचे आढळून आले. अंबड तालुक्यात सर्वाधिक 211 पैकी 93 नमुने दूषित आढळले त्या खालोखाल जालना तालुक्यात 254 पैकी 108  जाफराबाद 97 पैकी 39, भोकरदन 199 पैकी 78, परतूर 86 पैकी 17, मंठा 30 पैकी 5, घनसावंगी 122 पैकी 14, परतूर 86 पैकी 17 दूषित पाण्याची नोंद झाली. दूषित पाण्याचा विषय चिंताजनक आहे.