Fri, Sep 21, 2018 09:24होमपेज › Jalna › दुचाकी चोरट्यास अटक, 9 दुचाकी जप्त

दुचाकी चोरट्यास अटक, 9 दुचाकी जप्त

Published On: Aug 02 2018 1:58AM | Last Updated: Aug 02 2018 1:58AMजालना : प्रतिनिधी

चंदनझिरा पोलिसांनी देहेडकरवाडी भागात राहणार्‍या विनोदसिंग सत्तलाल राणा या मोटरसायकल चोराच्या ताब्यातून 9 मोटारसायकली जप्त केल्या. याची किंमत चार लाख रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काळेगाव येथील अशोक भालेराव यांनी नवीन मोंढा येथून मोटरसायकल (क्र. एम. एच. 21-ए डब्ल्यू - 2036) चोरीस गेल्याची फिर्याद चंदनझिरा पोलिस ठाण्यात 29 जुलै रोजी दिली. याचा तपास सुरू असताना पोलिसांना खबर्‍याने मोटरसायकल देहेडकरवाडी भागात राहणार्‍या विनोदसिंह सत्तलाल राणा याने चोरल्याची माहिती दिली. 

पोलिसांनी आरोपीस जेरबंद करून विचारणा केली असता त्याने नऊ मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या मोटारसायकली जप्‍त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक पठाण, राम शिंदे, अनिल काळे यांनी केली.