Sun, May 26, 2019 12:36होमपेज › Jalna › भोकरदनमध्ये नायब तहसीलदारांना मारहाण 

भोकरदनमध्ये नायब तहसीलदारांना मारहाण 

Published On: Mar 01 2018 1:40AM | Last Updated: Feb 28 2018 11:42PMभोकरदन : प्रतिनिधी

येथील तहसील कार्यालयात बुधवारी दुपारी नायब तहसीलदारांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चार तलाठ्यांसह इतर चार कर्मचार्‍यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा तर नायब तहसीलदार परेश चौधरी यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. तहसील कार्यालयातील लिपिक अश्‍विनी अजय देशपांडे यांनी नायब तहसीलदार परेश गजानन चौधरी यांच्याविषयी तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे की, खासगी जीवनाविषयी खालच्या पातळीवर बोलतात.

 दोन-तीन दिवसांपूर्वीही वाईट बोलले. बुधवारी (28 फेब्रुवारी) दुपारी जाब विचारण्यास गेल्यानंतर शिवीगाळ केली. नायब तहसिलदार चौधरी यांच्याविरुद्ध भोकरदन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नायब तहसीलदार चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एमईजी विभागातील लिपिक अश्‍विनी देशपांडे व अव्वल कारकुन लेकुरवाळे यांनी केलेला घोटाळा उघडकीस आणला. त्यांनी अडीच ते तीन लाखांचा अपहार केला. याबाबत जाब विचारला असता त्यांनी मारहाण केली. विनयभंगाच्या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनिरीक्षक वैशाली पवार या करीत आहेत.