Mon, Oct 21, 2019 02:51होमपेज › Jalna › फतेहपूरमध्ये हरिनाम सप्ताहाची सांगता

फतेहपूरमध्ये हरिनाम सप्ताहाची सांगता

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 1:21AMभोकरदन  : प्रतिनिधी 

फत्तेपूर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची  सांगता दहीहंडी फोडून करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या दिंडीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी हाती टाळ घेऊन फुगडी खेळली. सप्ताहाची सांगता रामायणाचार्य विष्णू महाराज सास्ते आणि महादेव महाराज गिरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. सास्ते महाराजांनी  साध्या आणि सोप्या भाषेत रामाच्या विविध लीला सांगितल्या. 

या लीलेतून त्यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा व आई- वडिलांची सेवा करण्याचा संदेश दिला. सप्ताहादरम्यान काकडा आरती, श्रीमद भागवत कथा, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांना लाभ मिळाला. यावेळी शिस्तबद्ध नियोजन टाकळीतील ग्रामस्थांनी केले होते.

सप्ताहकाळात लक्ष्मण महाराज कराड, मुरलीधर महाराज, कल्याण महाराज भुजंग, भागवत महाराज उगले, ज्ञानेश्‍वर माऊली महाराज, शिवाजी महाराज तळेकर, विट्ठल महाराज शिंदे या नामवंत महाराजांचे कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले. कीर्तन श्रवणासाठी भाविकांची दररोज गर्दी होत असत. सोमवारी (दि.19) सकाळी 9 वाजता ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महादेव महाराज गिरी यांचे काल्याच्या किर्तन झाले त्यानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.
  
WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19