Wed, Nov 21, 2018 20:19होमपेज › Jalna › भक्‍ती ठरली ‘द व्हाईस ऑफ जालना’

भक्‍ती ठरली ‘द व्हाईस ऑफ जालना’

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 10 2018 1:02AMजालना : प्रतिनिधी

येथील टिकारिया म्युझिकतर्फे आयोजित ‘द व्हाईस ऑफ जालना’ या गीतगायन स्पर्धेत शहरातील भक्‍ती सुनील पवार ही ‘द व्हाईस ऑफ जालना’ ठरली. बालगटात प्रज्योत जाधव याने बहुमान पटकावला.

येथील श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या सभागृहात 6 ते 8 जुलै दरम्यान ही स्पर्धा पार पडली. रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. वरिष्ठ गटातून ‘द व्हाईस ऑफ जालना’ होण्याचा मान भक्‍ती सुनील पवार हिने पटकावला. शिवा वाहुळे याने या गटात द्वितीय तसेच प्रीती इंगळे व गणेश शर्मा यांनी संयुक्‍तपणे तृतीय क्रमांक पटकाविला. बालगटात प्रज्योत जाधव याने प्रथम, अनुष्का मुंढे हिने द्वितीय तर प्रज्ञा बंड हिने तृतीय क्रमांक पटकावला. 

वरिष्ठ गटात नेहा खंडागळे, रेहान पटेल, पूजा वेताळ, ईश्‍वरी फतेलष्करी, आदित्य बिर्ला, दीक्षा म्हस्के, प्रीती सोनुने, पूजा जयरंगे, पायल गोधा, अश्‍विनी कायंदे, अमिता शाह, सुरभी राठी यांना टॉप टेन स्पर्धक म्हणून पारितोषिके देण्यात आली.

याशिवाय बालगटातून पलक सोनी, वैशाली रावल, प्रतीक सोळुंके, संस्कृती पवार, पलक अग्रवाल, श्रृती मंत्री यांनाही टॉप टेन स्पर्धक म्हणून पारितोषिके देण्यात आली. मनोज जैस्वाल, सागर आनंद सुराणा, घनश्याम बिर्ला, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मिता जैन, सचिव अनघा देशपांडे, प्रवीण जैस्वाल, रावसाहेब वेताळ,  विजय सकलेचा, भरत गादिया आदींच्या   हस्ते पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेत परीक्षक म्हणून राजेंद्र आडेप, नुपूर जैस्वाल यांनी काम पाहिले.