Fri, May 24, 2019 21:16होमपेज › Jalna › लेखी आश्‍वासनानंतर शेतकर्‍यांचे उपोषण मागे

लेखी आश्‍वासनानंतर शेतकर्‍यांचे उपोषण मागे

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 1:13AMजाफराबाद : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळखुटा येथील शेतकर्‍याने विकत घेतलेले बियाणे बोगस निघाले. परिणामी शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. संबंधित कंपनीवर कृषी विभागाने कारवाई करून नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. शनिवार, 19 रोजी त्यांनी उपोषण मागे घेतले. 

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण, पंचायत समिती कृषी अधिकारी राजरत्न गायकवाड, तालुका कृषी आधिकारी संतोष गायकवाड यांच्या उपस्थितीत चौकशीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शिवनारायण खंबाट यांनी उपोषण मागे घेतले. शेतकरी शिवनाराण फकिरबा खंबाट यांनी  दि.15 डिसेंबर 2017 रोजी जाफराबाद येथील एका दुकानातून महानंद सीड्स कंपनीचे कोबीचे तीन पॅकेट खरेदी केले होते. त्याची लागवड 0.20 आर क्षेत्रात केली. मात्र  ती बियाणे बोगस निघाली. लागवड केल्यावर एकही कोबीचे झाड आले नाही. दबारीक शेंगाचे झाडे उगवले. त्या झाडांचे पाने कोबीसारखे आहे. त्यांना फुलोरा आलेला आहे. तर  त्या अनोळखी झाडांना बारीक आकाराच्या शेंगा येत आहेत.  

शिवनारायण फकिरबा खंबाट यांनी दुकानदाराला  वारंवार तोंडी तक्रार केली. कृषी अधिकार्‍यांकडे 12 एप्रिल रोजी अर्ज केला. कृषी विभागाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर खंबाट यांनी उपोषण सुरू केले होते. 0.20आर क्षेत्रामध्ये महानंदी कंपनीने बोगस बियाणे दिल्यामुळे लागवड खर्च, बियाणे खर्च, औषधी व मजूर  आणि मेहनत असे लाखो रुपयाचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले असल्याचे खंबाट यांनी निवेदनात म्हटले आहे. 

चौकशी करून कारवाई होणार
कृषी विभागाकडे चौकशी व्हावी म्हणून पत्रव्यवहार केला. पंचनामाची प्रत ही संबंधितांना देण्यात आली होती. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाही केली जाईल असे पंचायत समिती कृषी अधिकारी राजरत्न गायकवाड यांनी सांगितले. यानंतर राजेश चव्हाण यांच्या मध्यस्थीने खंबाट यांनी उपोषण सोडले. कृषी अधिकारी संतोष गायकवाड, देवीदास पैठण उपस्थित होते.