Tue, Apr 23, 2019 23:34होमपेज › Jalna › नागेवाडीजवळ बीअरचा टेम्पो उलटला

नागेवाडीजवळ बीअरचा टेम्पो उलटला

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 11:34PMजालना : प्रतिनिधी

जालना-औरंगाबाद रस्त्यावरील नागेवाडीजवळ बीअर घेऊन जाणारा भरधाव टेम्पो रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उलटला. ट्रक उलटल्यानंतर बाटल्या मिळवण्यासाठी शौकिनांची एकच झुंबड उडली होती. रस्त्यावर बाटल्यांचा खच पडला होता. यामध्ये अंदाजे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला.

 औरंगाबादहून जालना येथील बियर शॉपींना पुरवठा करण्यासाठी हा टेम्पो  येत असताना अपघात झाला. जालना येथील दोन बियर शॉपींचा यात माल होता. अपघातानंतर अनेकांनी बीअरच्या बाटल्या पळवल्या. ट्रकसमोर कोणीतरी आल्याने चालकाने ब्रेक मारल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
 

Tags : Jalna, Nagewadi, Beer, tempo, overturned,