Mon, Aug 19, 2019 07:33होमपेज › Jalna › स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी तयार राहा  

स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी तयार राहा  

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 12:03AMघनसावंगी : प्रतिनिधी 

सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या  समस्या व शिवसैनिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी शिवसंपर्क अभियान असून, स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन उस्मानाबादचे माजी आमदार तथा पक्ष निरीक्षक ओमराजे निंबाळकर यांनी केले.

घनसावंगी विधानसभा मतदार संघात 22 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर उपजिल्हा प्रमुख पंडित भुतेकर, तालुकाप्रमुख उद्धव मरकड, पंकज सोळंके. हरिभाऊ पोहेकर, भुतेकर, अंकुशराव अवचार, प्रल्हाद बोराडे, जीवनराव वगरे, बापूसाहेब देशमुख, खालेद कुरेशी आदींची उपस्थिती होती. निंबाळकर म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जवळजवळ 30 बाबींवर चर्चा आणि शाखाप्रमुख ते पदाधिकारी यांच्या अडचणी आणि मतदार संघातील पक्षाचे काम यासाठी शिवसंपर्क अभियान राबवले जात आहे. जे पदाधिकारी जबाबदारीने काम करीत असतील त्यांना येणार्‍या काळात पदावर ठेवण्यात येणार आहे. पक्षात पद घेऊन मिरणारे नको, सत्ता असली तरी शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी.  

तालुक्यात अद्याप तूर खरेदी केंद्र सुरू झाले नसेल तर आंदोलन करा, असे सांगितले. मतदारसंघातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठी शिवसेनेचे पदाधिकारी झगडतात का, वेळोवेळी आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले जाते का, सर्व शाखा कार्यान्वित आहेत का या विषयी आढावा घेऊन व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे प्रश्न पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी यावेळी अनिरुद्ध शिंदे, पुरुषोत्तम उढाण, रमेश बोबडे, अशोक उदावंत, पंढरीनाथ उगले, कुंडलिक हेमके, अशोक शेलारे, दिगंबर उगले, धर्मराज आंधळे, विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.