Wed, Nov 14, 2018 14:58होमपेज › Jalna › जाफराबादेत बँक ऑफ महाराष्ट्र वाटप करणार ‘भीम पे’ मशीन

जाफराबादेत बँक ऑफ महाराष्ट्र वाटप करणार ‘भीम पे’ मशीन

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 12 2018 11:41PMजाफराबाद : प्रतिनिधी

येथील महाराष्ट्र बँकेच्या वतीने कॅशलेस व्यवहारासाठी भीम आधार पे (एम.पॉस) मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. 
याबाबत शाखाधिकारी नादोरे म्हणाले की, शाखेत खातेदारांचे बचत किंवा चालू खाते असणे गरजेचे आहे. तसेच खातेधारकाकडे स्मार्ट फोन असणेही आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-मेल आयडी, शॉपअ‍ॅक्ट परवाना, सहाशे रुपयांचा बाँड, एक फोटो व मशिन मिळण्यासाठीचा अर्ज भरुन शाखेत जमा करावा लागेल.शासनाच्या वतीने डिजिटल इंडिया हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जात असून पारदर्शक व्यवहार व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. 

म्हणूनच बँकेच्या माध्यमातून  व्यवहार सुरळीत चालण्यासाठी व भ्रष्टाचाराला लगाम लागावा यासाठी प्रथमतः सर्वांना बँक खाते उघडून घेण्याचे आवाहन केले होते. त्याला सर्व स्तरातून मोठ्या  प्रमाणात प्रतिसाद मिळाला.