Thu, Aug 22, 2019 04:45होमपेज › Jalna › भाजप पदाधिकार्‍याकडून महिलेस मारहाण

भाजप पदाधिकार्‍याकडून महिलेस मारहाण

Published On: Jan 29 2019 1:33AM | Last Updated: Jan 29 2019 1:33AM
जाफराबाद/डोणगांव : प्रतिनिधी

तालुक्यातील निवडुंगा येथील गट क्रमांक 470 शेतीच्या वादातून भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर व त्यांच्या सहकार्‍यांना गावातील महिलांना मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि.28) रोजी घडली. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.  याप्रकरणी रावसाहेब भवर व अन्य 8 जणांविरूध्द टेंभुर्णी्र पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडुंगा येथील गट क्रमांक 470 चा शेतीचा वाद सुरू असून  सदर वादाचा निकाल लागलेला नसताना आसरखेडा (ता. बदनापूर) येथील रावसाहेब भवर यांनी काही गुंड प्रवृत्तीचे लोक जमा करून जेसीबीद्वारे ज्ञानेश्वर खांडेभराड, कृष्णा खांडेभराड यांच्या शेतात विहीर खोदण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदर काम करू नये अशी विनंती करण्यासाठी  गेलेल्या महिलांना रावसाहेब भंवड यांच्यासह  गुंडांनी जबर मारहाण केली. जेसीबीद्वारे खोदण्यात पुरूण टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  या मारहाणीत रेणुका कृष्णा खांडेभराड, गंगाबाई  बळीराम खांडेभराड, विठ्ठल खांडेभराड  हे जखमी झाले आहे.  त्यांच्यावर टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जालना येथे हलविण्यात आले.  

या प्रकरणी रावसाहेब भवर, विष्णू भवर, ज्ञानदेव भवर, संजय भवर, आकाश भवर,विठ्ठल जगताप, बाबुराव जगताप आणि राजू सलामपुरे यांच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक सुरू असताना भाजप पदाधिकार्‍याकडून महिलेस मारहाणी झाली. यांचा संताप व्यक्त होतोे.