Wed, Nov 21, 2018 07:14होमपेज › Jalna › धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Published On: Mar 25 2018 1:53AM | Last Updated: Mar 25 2018 1:49AMजालना : प्रतिनिधी

पुणे येथील बालगृहातील 17 वर्षीय मुलीचे अश्‍लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बसस्थानकाजवळील लॉजमध्ये वारंवार बलात्कार केला. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राणासिंग भीमसिंग चुंगडे (अंबड, जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या बालवयाचा फायदा घेऊन जवळीक साधण्यासाठी राणासिंग चुंगडे याने वारंवार मोबाइलवरून पीडितेशी संवाद साधला. यानंतर जवळीक साधून पीडित मुलीचे मोबाइलमध्ये अश्‍लील फोटो शेअर करीन असे सांगून धमकी देत 13 ऑक्टोबर ते 27 जानेवारीदरम्यान वारंवार बलात्कार केला. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक काकडेकरत आहेत.

Tags : Jalna,j alna News, Atrocities, against, minor, girl threatened, Pune