Fri, Feb 22, 2019 15:51होमपेज › Jalna › मोबाईलवर गेम खेळताना स्फोट 

मोबाईलवर गेम खेळताना स्फोट 

Published On: May 18 2018 1:16AM | Last Updated: May 18 2018 12:11AMआष्टी : प्रतिनिधी

परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव तांडा येथील दहावर्षीय मुलाच्या हातातील मोबाईलचा स्फोट होऊन त्याची तीन बोटे निकामी झाली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. गंभीर जखमी बालकावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोकाटे हादगाव तांडा येथील उमेश कैलास राठोड (10) हा वडिलांच्या मोबाईलवर गेम खेळत होता. त्याच दरम्यान मोबाईलचा अचानक स्फोट झाला. यात उमेश याच्या डाव्या हाताच्या तीन बोटांना गंभीर दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. अचानक झालेल्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही.