Thu, Apr 25, 2019 04:10होमपेज › Jalna › अवाच्या सव्वा बिले आल्याने ग्राहक हैराण

अवाच्या सव्वा बिले आल्याने ग्राहक हैराण

Published On: Feb 19 2018 1:51AM | Last Updated: Feb 19 2018 1:59AM आष्टी  : प्रतिनिधी

परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात महावितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. ग्राहकांना नियमित वीज वापरापेक्षा अचानक मोठ्या रकमेची बिले देण्यात आली आहेत. मार्चअखेर असल्याने आधी बील भरा, वाढीव बिलाचे नंतर पाहू, अशी दुरुत्तरे ग्राहकांना ऐकावयास मिळत आहे. महावितरणने ग्राहकांना अवाच्या सव्वा बिले देण्याचा प्रकार गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू आहे.

ग्राहकांना चुकीचे येणारी बिले वारंवार चकरा मारूनही दुरुस्त केली जात नसल्याने ग्राहकांतून संताप व्यक्‍त केला जात आहे. आष्टी येथे महावितरणचे जवळपास दीड हजार ग्राहक आहेत. यापैकी अनेक जण प्रत्येक महिन्याला बिले भरतात. यामुळे या ठिकाणी महावितरणची वसुली चांगली आहे. वीज मिटरवर एक रिडिंग तर बिलावर भलतीच रिडिंग येत असल्याने हा प्रकार ग्राहकांनाही समजलेला नाही. बहुसंख्य बिलावरील फोटो गायब आहेत. यामुळे संबंधित एजन्सीने कोणत्या अधारे बिले दिली, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.